Devendra Fadnavis । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ!

Devendr fadanvis

Devendra Fadnavis । सध्या राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. अनेक पक्ष आपली उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत. नुकतीच ठाकरे गटाने त्यांची 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर केले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी सोबत न जाता एकला चलोचा नारा दिला आहे. या सर्व घडामोडी पाहून आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा केला आहे.

Topers Ad

Car Accident । कारचा भीषण अपघात! धडकेत तरुण-तरुणी जागीच ठार

महाविकास आघाडीमध्ये कुणाचा पायपोज कुणाच्या पायात नाही. अनेक लोक महाविकास आघाडीतून बाहेर पडतील. असा मोठा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्याचबरोबर वंचित आणि महाविकास आघाडी मध्ये काय झालं? हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्या संदर्भात मला काही बोलायचं नाही अशी टीका देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.

Motorola edge 50 Pro । बजेट ठेवा तयार! बाजारात लवकरच येतोय ‘हा’ शक्तिशाली फोन, जाणून घ्या खासियत

त्याचबरोबर यावेळी फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणालो म्हणाले, “आम्हाला उद्धव ठाकरेंचा खूप वर्षाचा अनुभव आहे. आम्हाला याची सवय आहे. जर काँग्रेसला त्यांच्यासोबत राहायचं असेल तर त्यांना देखील ही सवय करून घ्यावी लागेल कारण ते असंच वागतात. असा टोला देखील फडणवीस यांनी लगावला आहे.

Politics News । सोलापूरच्या राजकारणात मोठा भूकंप! अमोल कोल्हे भाजप नेते मोहिते पाटलांच्या भेटीला

Spread the love