Devendra Fadnavis । पुणे : काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इंदापूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आज इंदापुरातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. सभेदरम्यान फडणवीसांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. पण आगामी निवडणुकीत शरद पवारांना (Sharad Pawar) धक्का बसण्याची शक्यता आहे. (Latest marathi news)
Eknath Shinde । निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढली; या ठिकाणी बसणार मोठा धक्का
कारण देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या मेळाव्यासाठी इंदापुरात दाखल झाल्यानंतर तातडीने इंदापूर तालुका प्रचार समितीचे प्रमुख प्रविण माने (Pravin Mane) यांची भेट घेतली. या भेटीमुळे प्रवीण माने आता अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Devendra Fadnavis meets Pravin Mane)
“प्रविण माने दादांशी माझे खूप जुने संबंध असून ते अनेकवेळा माझ्या घरी येतात. प्रविण माने मागील अनेक दिवसांपासून माझ्या मागे लागले होते की, इंदापुरात तुम्ही येता पण माझ्याकडे येत नाहीत. त्यामुळे मी असं कबूल केलं होती की, मी तुमच्याकडे चहा प्यायला येईल. त्यामुळे मी त्यांच्याकडे चहा प्यायला गेलो होतो,” असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
Loksabha election । लोकसभा निवडणुकीत शरद पवार करणार सर्वात मोठा गेम!