Devendra Fadnavis । सध्या तंत्रज्ञानामध्ये दिवसेंदिवस मोठे बदल होत होताना दिसत आहेत. येणाऱ्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स मोठे बदल करणार आहे. यामुळे 23 कोटी लोकांचा रोजगार जाणार आहे. त्याचबरोबर 25 कोटी जणांना नवीन रोजगाराच्या संधी मिळणार असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नागपूर या ठिकाणी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजित कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केले आहे.
Rashmika Mandanna । ब्रेकिंग न्यूज! रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडिओ प्रकरणात मुख्य आरोपीला अटक
या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर विरोधकांना टोला देखील लगावला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ज्यावेळी कॉम्प्युटर आले त्यावेळी लालूप्रसाद यांनी टीका करत शेती कम्प्युटर करणार का? असा सवाल केला होता. त्याचबरोबर मी समृद्धी महामार्ग तयार करत असताना देखील माझ्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. रोड शोची आवश्यकता आहे का?असे प्रश्न विचारायचे. मात्र आज माझ्याकडे समृद्धी पूर्ण व्हायच्या आधी 50 हजार कोटींची ऑफर समृद्धीसाठी आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाला घाबरून घरी बसता येणार नाही. याचा उपयोग करून प्रगती करावी. असं फडणवीस म्हणाले आहेत.
Sunil Shetty । ‘या’ कारणामुळे अभिनेत्रींना सुनील शेट्टीसोबत काम करायचे नव्हते; वाचून बसेल धक्का
त्याचबरोबर पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “देश वेगाने विकसित होत आहे आणि अर्थव्यवस्थेत देखील भरारी घेत आहे. चीन नंतर भारताचा स्टार्टअप मध्ये दुसरा नंबर आहे. २०२० ते ३५ पर्यंत आपण उचांकावर आहे तर २०५० नंतर आपल्या देशावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. असं फडणवीस म्हणाले आहेत.