Sunil Shetty । सुनील शेट्टीने आत्तापर्यंत शेकडो चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण क्वचितच कोणाला माहित असेल की त्याला अनेक वेळा चित्रपटांमधून काढून टाकण्यात आले आहे. हा तो काळ होता जेव्हा तो एका नवीन उद्योगात उतरला होता आणि स्वतःचे नाव कमावण्याचा प्रयत्न करत होता. चित्रपटातून बाहेर पडण्याचे कारण दुसरे तिसरे काही नसून त्याचा सावळा रंग होता. अशा अनेक अभिनेत्री होत्या ज्यांना केवळ याच कारणामुळे त्याच्यासोबत काम करायचे नव्हते. हे १९९० चे दशक होते.
खुद्द अभिनेत्याने एका मुलाखतीदरम्यान याचा खुलासा केला होता. अभिनेता म्हणाला की, जेव्हा तो 1990 मध्ये बॉलिवूडमध्ये हिरो बनण्यासाठी आला होता. हा तो काळ होता जेव्हा लोकांच्या मनात अभिनेत्याच्या प्रतिमा वेगळी होती. लोकांना कोणत्याही काळ्या त्वचेचा अभिनेता पाहायचा नव्हता. त्यामुळे अनेक अभिनेत्रींनी माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला होता असा खुलासा एका मुलाखतीत सुनील शेट्टीने केला.
Mumbai News । धक्कादायक बातमी! बॉयफ्रेंडने गळा घोटत संपवलं गर्लफ्रेंडला
यांनतर 1992 मध्ये दिव्या भारतीने सुनील शेट्टीसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर तिचा पहिला चित्रपट बलवान रिलीज झाला. या चित्रपटाने प्रदर्शित होताच धमाका केला. हा चित्रपट बराच वेळ चालला आणि त्यानंतर सुनील शेट्टी देखील चांगलाच चर्चेत आला.
NCP MLA disqualification Case । राष्ट्रवादी आमदार प्रकरणात समोर आली सर्वात मोठी अपडेट!