Ajit Pawar । अजित पवारांना बसणार धक्का? विधानसभेला ‘हा’ पवार बारामतीमध्ये ठोकणार तळ

Ajit Pawar

Ajit Pawar । सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष्य बारामती लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागलं आहे. कारण या ठिकाणी पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळाली आहे. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना आहे. बारामतीच्या निकालाने महाराष्ट्रातील भविष्याच्या राजकारणाची दिशा स्पष्ट होणार आहे. यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.

Eknath Shinde । मतदानापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सर्वात मोठा दावा!

अजित पवार यांचा गट सत्ताधारी महायुतीचा भाग आहे, तर शरद पवार यांचा गट विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीमध्ये आहे. त्यामुळे विजयाचा गुलाल कोण उडवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान लोकसभा निवडणूक झाल्यानंतर काही दिवसातच विधानसभा निवडणूक होणार आहेत. लोकसभेनंतर विधानसभेला देखील बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार सामना होण्याची शक्यता आहे.

Rakhi Sawant Health । हृदयाचा त्रास, किडनी निकामी, पोटात गाठ…राखी सावंत एकाच वेळी अनेक आजारांनी त्रस्त, धक्कादायक माहिती समोर

विधानसभेला बारामतीमध्ये अजित पवार यांना पवार कुटुंबातूनच आव्हान मिळू शकतं. अजित पवार यांना विधानसभेला युगेंद्र पवार आव्हान देण्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात रंगल्या आहेत. युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे सख्खे बंधु श्रीनिवास पवार यांचा पुत्र आहे. लोकसभा निवडणुकीपासूनच युगेंद्र पवार बारामतीच्या राजकारणात सक्रीय झाले आहेत. त्यांनी सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला आहे.

Ajit Pawar Health । ब्रेकिंग! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर

Spread the love