Madha Lok Sabha । शरद पवारांचा शिंदे गटाला मोठा धक्का, बडा नेता करणार पक्षात प्रवेश

Madha Lok Sabha

Madha Lok Sabha । आज 21 राज्यांमधील लोकसभेच्या 102 जागांवर मतदान होत आहे. दरम्यान,मागील काही दिवसांपासून माढा लोकसभा मतदारसंघ खूप चर्चेत येत आहे. याला कारणही अगदी तसेच आहे. या मतदारसंघात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. लोकसभेपूर्वीच शिवसेनेतील (Shivsena) बड्या नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे, याचा शिवसेनेला मोठा फटका बसू शकतो. (Latest marathi news)

Baramati Loksabha । अजित पवार आणि सुनेत्रा पवारांकडे आहे ‘इतकी’ मालमत्ता, समोर आली महत्त्वाची माहिती

करमाळा तालुका शिवसेना शिंदे गट तालुकाप्रमुख देवानंद बागल (Devanand Bagal) यांनी आपल्या तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा शिवसेना सचिवांकडे पाठवला आहे. शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीमुळे पक्ष वाढीला मर्यादा येत आहे, त्यामुळे आपण तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे, असे देवानंद बागल यांनी सांगितले आहे.

Supriya Sule । राजकीय वर्तुळात खळबळ! सुप्रिया सुळेंबाबत धक्कादायक बातमी समोर

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शिंदे गटाचे समर्थक असलेले माजी आमदार नारायण पाटील (Narayan Patil) यांनी देखील दोन दिवसापूर्वीच आपल्या शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशातच आता देवानंद बागल यांनी देखील आपल्या तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा शिंदे गटासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

Pune News । लग्नाला अवघे काही तास बाकी, मात्र नवरदेवासोबत घडलं भयानक; संपूर्ण कुटुंबावर पसरली शोककळा

Spread the love