Laser Light । गणपती विसर्जन मिरवणुकीत नाचणे आले अंगलट, लेझर लाईटमुळे 6 जणांचा डोळा जाण्याची शक्यता

Dancing in Ganapati Visarjan Procession, 6 people are likely to lose their eyes due to laser light.

Laser Light । नाशिक : नुकतेच जड अंतःकरणाने सर्वांनी लाडक्या बाप्पाला (Ganeshotsav 2023) निरोप दिला. लोक ज्या उत्साहाने बाप्पाला घरी आणतात, त्याच उत्साहाने ते त्याचे विसर्जन (Ganeshotsav) करतात. अशातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीत लावण्यात आलेल्या लेझर लाईटमुळे (Laser light) 6 जणांची नजर कमकुवत झाली आहे. त्यांचा डोळाही जाऊ शकतो, अशी भीती आहे. (Latest Marathi News)

Desi Jugad । जुन्या वस्तूंपासून शेतकऱ्याने बनवला भन्नाट ट्रॅक्टर; १ लिटर डिझेलमध्ये १० गुंठे शेत नागंरणार

ही घटना नाशिक (Nashik News) येथे घडली आहे. विशेष म्हणजे आठ वर्षानंतर नाशिक शहरांत डीजेला परवानगी दिली होती. अनेकजण डीजेच्या तालावर नाचत होते. परंतु काहींना नाचणे अंगलट आले आहे. लेझर लाईटमुळे काहींच्या डोळ्यांमध्ये इजा तर काहींच्या डोळ्यांमध्ये काळे डाग पडले आहेत. पीडितांनी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावं, असे आवाहन केले आहे.

Love Story | टिकटॉकवर जडला जीव, प्रेमापोटी बांगलादेशवरून युपीला गेली ३ मुलांची आई; पुढे घडलं असं…

“गणपती मिरवणुकीमध्ये लेझर लाईटसच्या संपर्कात आलो आहे असे रुग्णांनी सांगितले. याविषयी आमच्या ग्रुपवर चर्चा झाल्यानंतर नंदुरबार, धुळे आणि मुंबई इथल्या मित्रांनीही याबाबत सांगितले आहे. या रुग्णांची दृष्टी जितकी बचावता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. परंतु,ते पूर्णपणे ठीक होणार नाही,” अशी माहिती नेत्ररोग तज्ञ सुनील कासलीवाल यांनी दिली आहे.

Dance Video । पोलिसांच्या गाडीवर बसून बनवत होती रील्स, पुढे असं काही घडलं की…

Spread the love