Love Story | प्रेमासाठी (Love) कोणीही कोणत्याही थराला जाऊ शकतो. अनेकजण प्रेमविवाह (Love marriage) करतात. महत्त्वाचे म्हणजे प्रेमविवाहाला घरच्यांचा विरोध असतो. तरीही ती जोडपी आपल्या निर्णयावर ठाम राहतात. अलीकडच्या काळात सोशल मीडियाचा (Social media) वापर जास्त होऊ लागला आहे. विशेष म्हणजे या प्लॅटफॉर्मवर अनेकजण प्रेमातही पडतात. प्रेमासाठी ते देशाच्या सीमाही पार करतात. (Latest Marathi News)
Dance Video । पोलिसांच्या गाडीवर बसून बनवत होती रील्स, पुढे असं काही घडलं की…
प्रेम कधी कोणावर होईल हे सांगता येत नाही. प्रेमाला वय नसते. तसेच प्रेमाला बंधनही नसते. असेच काहीसे बांगलादेशमध्ये घडले आहे. तीन मुलांच्या आईचे टिकटॉकवर (Tiktok) एका व्यक्तीवर जीव जडला. ती प्रेमापोटी बांगलादेशवरून युपीला गेली, परंतु पुढे असे काही घडले की तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
Gautami Patil । गौतमीच्या ‘त्या’ कार्यक्रमाच्या वादात नवीन ट्विस्ट, नेमकं प्रकरण काय?
बांगलादेशमधील 3 मुलांची आई असणाऱ्या दिलरुबा शर्मी प्रेमात पडल्या आणि त्यांनी थेट यूपीमधील (UP) श्रावस्ती गाठली. परंतु, प्रियकराच्या घरी पोहोचताच त्यांना प्रियकराच्या पत्नीसह कुटुंबीयांनी तिला विरोध केल्याने मोठा गोंधळ झाला. हे प्रकरण पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचले. त्यानंतर तीन मुलांची आई बांगलादेशात परत जाण्यासाठी लखनौला रवाना झाली आहे. या महिलेचा व्हिसा वैध असल्याने तिला जाण्याची परवानगी दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
CNG-PNG Price । सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी! सीएनजी-पीएनजीचे घसरले दर
TikTok वर जडला जीव
भारत-नेपाळ सीमेला लागून असणाऱ्या श्रावस्तीमध्ये एक गाव असून ज्याचे नाव भरता रोशनगड असे आहे. येथे राहणारे अब्दुल करीम बुहरान हे एका बेकरीमध्ये काम करत होते. वेळ मिळेल तेव्हा अब्दुल करीम TikTok पाहत होते. त्यावेळी त्यांची ओळख दिलरुबा शर्मा नावाच्या महिलेशी झाली. दिलरुबा शर्मी ही बांगलादेशातील चटगाव रौजान येथील रहिवासी असून त्यांच्या पतीचा कोरोनाच्या अगोदर मृत्यू झाला. सुरवातीला करीम आणि दिलरुबा यांची मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
Crop insurance । खुशखबर! पहिल्या टप्प्यात सव्वाकोटी शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा
ती पोहोचली प्रियकराच्या घरी
सीमाप्रमाणेच दिलरुबा शर्मा या आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी टूरिस्ट व्हिसावर मुलगी आणि दोन मुलांसह बांगलादेशातून श्रावस्तीला गेली. परंतु अब्दुल करीम यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांनीही दिलरुबा शर्माला विरोध केला. पोलिसांनी दिलरुबा शर्मा आणि अब्दुल करीम यांना पोलिस ठाण्यात नेऊन अखेर दिलरुबा शर्मा आपल्या मुलांसह श्रावस्तीहून लखनौला रवाना झाली. धक्कादायक म्हणजे टिकटॉकच्या माध्यमातून मैत्री झाल्यानंतर अब्दुल करीमने स्वत:ला बॅचलर घोषित केल्याने दिलरुबा शर्मी आपल्या तीन मुलांसह बांगलादेशातून श्रावस्तीला गेल्या होत्या.
प्रियकराने केली फसवणूक
याबाबत शर्मी यांनी असे सांगितले की, श्रावस्तीला गेल्यानंतर तिला असे समजले की अब्दुल करीम अगोदरच विवाहित असून तो एका मुलाचा बाप आहे. अब्दुल करीम हा खोटारडा असल्याने मी माझ्या मुलांसह माझ्या घरी परतत आहे, कारण मला तेथे राहणे ठीक वाटले नाही.
Alibaug News । धक्कादायक बातमी! अंगावर वीज पडून पिता-पुत्राचा जागीच मृत्यू
याप्रकरणी एसएसपी प्रवीण कुमार यादव यांनीही माहिती दिली आहे. दिलरुबा बांगलादेशातून टुरिस्ट व्हिसावर अब्दुल करीमच्या घरी आली होती. मल्हीपूर पोलीस ठाणे आणि एलआययूसह सर्व यंत्रणांनी त्याची कागदपत्रे तपासली असून ती पूर्णपणे वैध असल्याने त्या आधारे त्याला परत पाठवले आहे.