Dance Video । पोलिसांच्या गाडीवर बसून बनवत होती रील्स, पुढे असं काही घडलं की…

She was making reels sitting on the police car, then something happened that...

Dance Video । अलीकडच्या काळात सोशल मीडियाचा (Social media) वापर करणाऱ्याची संख्या जास्त झाली आहे. विशेष म्हणजे फक्त तरुणाई नाही तर लहान मुलेही सोशल मीडियाचा वापर (Social media uses) जास्त करत आहेत. आता तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमावता येतील. त्यासाठी अनेकजण वेगवगळे रील्स (Reels) बनवतात. परंतु रील्सच्या नादात अनेकजण कोणत्याही थराला जातात. (Latest Marathi News)

Gautami Patil । गौतमीच्या ‘त्या’ कार्यक्रमाच्या वादात नवीन ट्विस्ट, नेमकं प्रकरण काय?

अशीच काहीशी घटना पंजाबमधील जलंदर येथे घडली आहे, एका तरुणीने रील बनवण्यासाठी चक्क पोलिसांच्या गाडीचा वापर केला. परंतु पोलिसांच्या गाडीवर बसून रील बनवण्यासाठी परवानगी देणे पोलीस अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. याबाबतचा व्हिडिओ त्या तरुणीने सोशल मीडियावर शेअर (Viral video) केला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी “मैं हां शेर दी शेरनी’ बोल रही है” या गाण्यावर डान्स करत आहे.

पहा व्हिडिओ

CNG-PNG Price । सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी! सीएनजी-पीएनजीचे घसरले दर

मीडिया रिपोर्टनुसार, अशोक शर्मा असे या पोलिसाचं नाव असून तो एका पोलीस ठाण्याचा प्रभारी आहे. त्या तरुणीला रील बनवण्यासाठी परवानगी दिल्याने जलंदर पोलीस आयुक्त कुलदीप चहल यांनी त्यांना सस्पेंड केले आहे. त्यानंतर आता त्या तरुणीवरही कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. त्या तरुणीने पोलिसांची माफी मागत पुन्हा अशी चूक होणार नाही असे आश्वासन दिले आहे.

Crop insurance । खुशखबर! पहिल्या टप्प्यात सव्वाकोटी शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा

Spread the love