Cylinder Price । निवडणुकीच्या धामधुमीत सर्वसामान्यांना मोठा दिलासा, LPG सिलिंडर झाला स्वस्त; पाहा नवीन दर

Cylinder Price

Cylinder Price । सध्या सगळीकडे आपल्याला लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. गॅस सिलिंडरच्या दरात कपात झाल्याची माहिती समोर आली आहे. एलपीजी सिलिंडर आजपासून १९ रुपयांनी स्वस्त झाला आहे. मात्र, हे बदल केवळ व्यावसायिक सिलिंडरच्या दरात झाल्याची माहिती मिळत आहे.

Satara Loksabha । मोठी बातमी! लोकप्रिय अभिनेत्रीचा शरद पवार गटात प्रवेश

सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने जनतेला महागाईपासून दिलासा दिला आहे. तेल विपणन कंपन्यांनी सलग दुसऱ्या महिन्यात १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत कमी केली आहे. दिल्लीत त्याची किंमत आता 1745.50 रुपये आहे. यापूर्वी ते 1764.50 रुपयांना उपलब्ध होते. अशा प्रकारे त्याची किंमत 19 रुपयांनी कमी झाली आहे. यापूर्वी 1 एप्रिल रोजी ते 30.50 रुपयांनी स्वस्त झाले होते. आता 19 किलोचा सिलेंडर कोलकात्यात 1859 रुपये, मुंबईत 1698.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 1911.00 रुपयांना मिळणार आहे. कमी झालेले दर आजपासून लागू झाले आहेत.

Sharad Pawar । “होय, मी भटकती आत्मा…”; शरद पवारांचं मोदींना प्रत्युत्तर

१९ किलोच्या सिलेंडरच्या किंमतीतील कपातीमुळे बाहेर खाणे आणि पिणे स्वस्त होईल अशी अपेक्षा आहे. मात्र, घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 14.2 किलो एलपीजी सिलिंडरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीतील सामान्य ग्राहकांसाठी त्याची किंमत 803 रुपये आहे, तर उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी त्याची किंमत 603 रुपये आहे.

Nana Patole | राजकीय वर्तुळात मोठी खळबळ, फडणवीसांवर टीका करताना नाना पटोलेंची घसरली जीभ; म्हणाले…

Spread the love