
Crime News । महाराष्ट्राची राजधानी मुंबईत पती-पत्नीमध्ये भांडण होऊन खून झाल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने आपल्या 22 वर्षीय पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे. मुंबईतील कांजूरमार्ग येथे चार महिन्यांपूर्वीच दोघांचा विवाह झाला होता. टेम्पो चालक म्हणून काम करणाऱ्या २४ वर्षीय आरोपीला मुंबई पोलिसांनी गाझीपूर, यूपी येथून अटक केली आहे.
पती-पत्नीमध्ये काही कारणावरून भांडण झाल्याचा संशय आहे. हत्येमागील नेमके कारण अद्याप पोलिसांना सापडलेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नापूर्वी आरोपी आणि मृत पत्नी फेसबुकच्या माध्यमातून संपर्कात आले होते. यानंतर दोघांची मैत्री झाली आणि नंतर लग्न झाले.
Abhishek Ghosalkar | गोळीबारात मृत्यू झालेले अभिषेक घोसाळकर नेमके कोण आहेत?
या प्रकरणाबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, 24 वर्षीय आरोपीने त्याच्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्यात जोरदार भांडण झाली. घराला कुलूप लावून पळून जाण्यापूर्वी आरोपींनी मयताचे हात-पाय बांधले आणि तिचा मृतदेह बेडशीटमध्ये गुंडाळला. त्यांच्या भाड्याच्या घरात गेल्या रविवारी सायंकाळी ही घटना घडली. मंगळवारी शेजाऱ्यांनी घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार करून पोलिसांना कळवले असता खून प्रकरण उघडकीस आले.