Sanjay Raut । मुंबईतील दहिसर येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. दहिसरमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर तीन गोळ्या झाडून आरोपी मॉरीस नरोना यानेही स्वत:वर झाडल्या आहेत. या घटनेत त्याचाही मृत्यू झाला आहे. अशातच आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे. (Latest marathi news)
मॉरीस नरोना (Maurice Narona) हा चार दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर गेला होता. शिंदे यांनी त्याला आपल्या पक्षात येण्याचे निमंत्रण दिले. सध्या महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे असे मी रोज सांगत आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांचा मुलगा रोज गुंड टोळ्याना भेटत आहेत. पक्षात प्रवेश देत आहेत. गृहमंत्री अदृश्य झाले असून राज्य गुंडांच्या तावडीत आहे. त्यामुळे त्यांना कायद्याची भीती उरली नसून पोलिस हे शिंदे गँगच्या सेवेसाठीच उरले आहेत, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रात गुंडा राज!
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 8, 2024
अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मोरिश narohna चार दिवसांपूर्वीच
वर्षा बंगल्यावर होता.मुख्यमंत्री त्याला भेटले. मोरीश याला शिंदे सेनेत येण्याचे आमंत्रण दिले!(वर्षा बंगला गुंड टोळ्यांचा अड्डा झालाय)आज त्यानें अभिषेकवर गोळ्या चालवून बळी घेतला!
फडणविस… pic.twitter.com/px2scxZ4jV
इतकेच नाही तर संजय राऊत यांनी मॉरिस आणि एकनाथ शिंदे यांचा भेटतानाचा एक फोटो देखील पोस्ट केला आहे. शिंदे यांनी त्याला आपल्या पक्षात येण्याचे निमंत्रण दिले, असा दावा राऊत केला आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावर आता एकनाथ शिंदे कोणती प्रतिक्रिया देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.