Abhishek Ghosalkar | गोळीबारात मृत्यू झालेले अभिषेक घोसाळकर नेमके कोण आहेत?

Abhishek Ghosalkar

Abhishek Ghosalkar | मुंबईतील दहिसर येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. दहिसरमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे घोसाळकर यांना गोळ्या घालणारा आरोपी मॉरीस भाई यानेही स्वत:वर गोळी झाडली. त्याने स्वतःवर चार वेळा गोळी झाडली. त्याचाही मृत्यू झाला आहे.

Delhi Metro Video । दिल्ली मेट्रोमध्ये सीटवरून महिलांमध्ये तुफान गोंधळ, भांडण पाहून लोकांनी घेतला आनंद

कोण आहे अभिषेक घोसाळकर? (Who is Abhishek Ghosalkar?)

अभिषेक घोसाळकर हे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत. अभिषेक घोसाळकर यांनी सुरुवातीला सामाजिक कार्य सुरू केले. यानंतर त्यांनी महापालिकेची निवडणूक लढवली. अभिषेक घोसाळकर हे मुंबई महापालिकेत दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. दहिसरमध्ये त्यांच्याकडे तरुण आणि उत्साही नेता म्हणून पाहिले जाते. अभ्यासू आणि उत्साही नगरसेवक अशी त्यांची प्रतिमा आहे. घोसाळकर हे दहिसर कांदरपाडा प्रभाग क्रमांक 7 चे नगरसेवक होते. सध्या हा प्रभाग शीतल म्हात्रे यांच्या ताब्यात आहे.

Abhishek Ghosalkar । अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर!

गोळी झाडणारा मॉरीस भाई कोण?

गँगस्टर मॉरिस हा बोरिवली पश्चिम येथील आयसी कॉलनीमध्ये राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. तो समाजसेवक मॉरिस नरोना उर्फ ​​मॉरिस भाई म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्यावर बलात्कार, खंडणी व फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर एका महिलेची ८८ लाख रुपयांची फसवणूक आणि तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्याने या महिलेला धमकीही दिली होती. धमकीचा कथित व्हिडिओही व्हायरल झाला होता. एवढेच नाही तर न्यायालयात जाताना त्यानी पत्रकारांनाही धमकावले असल्याचे बोलले जात आहे. मॉरिस भाई यांनी प्रभाग क्रमांक एकमधून महापालिकेची निवडणूक लढवली होती.

Abhishek Ghosalkar । बिग ब्रेकिंग! महारष्ट्र हादरला, गोळीबारात ठाकरे गटाच्या अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू

Spread the love