Cricketer Dies l महाराष्ट्रातील संभाजीनगर जिल्ह्यात २८ नोव्हेंबर रोजी पुण्यातील गरवारे स्टेडियममध्ये खेळलेल्या क्रिकेट सामन्यात एक दुःखद घटना घडली आहे. ३५ वर्षीय क्रिकेटपटू इम्रान पटेल याचे मैदानावरच हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. या घटनेने क्रिकेट प्रेमींमध्ये शोककळा पसरली आहे.
Narendr Modi । ब्रेकिंग! पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांकडून तपास सुरु
गरवारे स्टेडियममध्ये लकी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स विरुद्ध यंग इलेव्हन या संघांमध्ये सामना सुरू होता. इम्रान पटेल “लकी” या संघाचा कर्णधार होता आणि फलंदाजीसाठी मैदानावर आला. तुफानी फलंदाजीची सुरुवात करत असतानाच त्याला छातीत आणि हातामध्ये तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्याने पंचांना याबाबत सांगितले आणि पंचांनी त्याला मैदान सोडण्याची परवानगी दिली. पॅव्हेलियनच्या दिशेने जात असताना, इम्रान अचानक मैदानावर बेशुद्ध पडला.
Eknath Shinde । ब्रेकिंग! मुख्यमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदे यांनी केले सर्वात मोठे वक्तव्य
त्याला तातडीने रुग्णालयात नेले गेले, पण तिथे पोहोचल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सामन्याच्या लाईव्ह प्रक्षेपणामुळे कॅमेऱ्यात कैद झाला आणि तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. इम्रान पटेलच्या अचानक मृत्यूने क्रिकेट जगताला एक मोठा धक्का दिला आहे. या घटनेवर शोक व्यक्त करत असताना, इम्रानच्या कुटुंबीयांसाठी आणि मित्रांसाठी सर्व क्रिकेट प्रेमींनी दुःख व्यक्त केले आहे.