राज्यात लवकरच विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका पार पडणार आहेत. याच पार्शवभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. परंतु निवडणुका तोंडावर असताना अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते पक्षांतर करत आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मोठा धक्का बसला आहे. कारण भिवंडी (Bhivandi) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १८ नगरसेवक (NCP Corporator) सहा वर्षांसाठी अपात्र ठरवण्यात आले आहेत. (Latest Marathi News)
‘उबाठा’चा आणखी, एक मोहरा होणार कमी’, शिंदे गटाच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
दरम्यान, भिवंडी महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणूकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या १८ नगरसेवकांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात मतदान केले होते. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवार रिषीका राका (Rishika Raka) यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे या नगरसेवकांचे पद कायमचे रद्द करावे, अशी मागणी काँग्रेसचे माजी महापौर नगरसेवक जावेद दळवी (Javed Dalvi) यांनी केली होती.
मस्तच..! ‘या’ ठिकाणी खरेदी करता येतोय 5G फोन अवघ्या 10 हजारांना, जाणून घ्या संपूर्ण ऑफर
दळवी यांनी केलेल्या याचिकेवर नगरविकास विभागाने हा निर्णय दिला आहे. या १८ नगरसेवकांना पुढील सहा वर्षांसाठी निवडणूक लढवता येणार नाही, असे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावरच राष्ट्रवादीला मोठा फटका बसला आहे. याचा परिणाम येत्या निवडणुकांमध्ये दिसून येईल.
‘महाराष्ट्र दौरा करण्यापेक्षा कोण मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष होणार? या घरातल्या वाटण्या करा’