‘उबाठा’चा आणखी, एक मोहरा होणार कमी’, शिंदे गटाच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा

uddhav thackeray

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेचे (Shivsena) दोन गट पडले आहेत. शिंदे यांनी भाजपसोबत युती करत मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. परंतु राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Government) आल्यापासून ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते ठाकरेंची साथ सोडून इतर पक्षात प्रवेश करत आहेत. अशातच आता शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी ठाकरे (Thackeray) गटाचा नेता आज शिंदे गटात प्रवेश करणार आहे, असे ट्विट केले आहे. (Latest Marathi News)

मस्तच..! ‘या’ ठिकाणी खरेदी करता येतोय 5G फोन अवघ्या 10 हजारांना, जाणून घ्या संपूर्ण ऑफर

नरेश म्हस्के यांनी “आज ‘उबाठा’चा आणखी, एक मोहरा कमी होईल, खऱ्या शिवसेनेत येऊन, विचारांशी निष्ठा ठेवील, नाहीच राहू शकत तिथे, खरे कार्यकर्ते आता, स्मशान शांतता पसरणार तिकडे, मारोत कुणी काही बाता, सुपडा साफ होणार आणि तुमचे उखळ पांढरे होणार, ‘उठा’ तुमच्यावर लवकरच, झोपायची वेळ येणार, ED चा फेरा ठेपलाच आहे, येऊन तुमच्या दारी, म्यान करून ठेवा, तुमच्या गंजल्या तलवारी”, असे सूचक ट्विट केले आहे.

‘महाराष्ट्र दौरा करण्यापेक्षा कोण मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष होणार? या घरातल्या वाटण्या करा’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी आज ठाकरे गटाच्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचा दावा म्हस्के यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. परंतु आता ठाकरे गटाचा कोणता नेता शिंदे गटात जाणार हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे.

फडणवीसांच्या ‘त्या’ आरोपाला शरद पवारांनी दिले सडेतोड उत्तर; म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे..’

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *