Mandavagan News | मांडवगण एसटी स्टॅण्ड ते मराठी शाळा या मुख्य रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली होती.संभाजी ब्रिगेडच्या वतीने रस्त्यावरील खड्यात वृक्षारोपण करून सार्वजनिक बांधकाम खात्याचे याकडे लक्ष वेधण्यात आले होते.या रस्त्याने शाळा तसेच प्राथमीक आरोग्य केंद्रा,बाजारतळा कडे जाताना नागरिकांची आणि शालेय विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होयची तसेच रस्ता रस्ता वर जागोजागी खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली होती.संभाजी ब्रिगेडच्या आंदोलन नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री.वराळे यांच्या वतीने रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन संभाजी ब्रिगेडला देण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री.वराळे साहेब यांच्या हस्ते या रस्त्याचा शुभारंभ करून कामाची सुरुवात करण्यात आली.
Mandavagan News । वॉटर शेड संस्थेच्या वतीने मांडवगण येथे तीन हजार वृक्षांचे वृक्षारोपण
रस्ता काँक्रिटिकरण मुळे नागरिकांची आणि शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे.संभाजी ब्रिगेडच्या वतीने वेळोवेळी या रस्त्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता.रस्त्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष संग्राम देशमुख,श्री.वराळे साहेब,श्री.राहुल शिंदे,सिद्धार्थ घोडके,माऊली कण्हेरकर,गणेश लोखंडे,योगीराज मोटे आणि ग्रामस्थ.
Vinesh Phogat Final Match । मोठी बातमी! विनेश फोगाटची सेमीफायनलला धडक
संग्राम देशमुख
(प्रदेश उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड,शेतकरी आघाडी)