Buldhana News । धक्कादायक! पोलीस स्टेशनमध्येच भाजप नेत्याकडून महिलेला मारहाण; पाहा व्हिडीओ

Buldhana News

Buldhana News । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बुलढाण्यामध्ये भाजप नेत्याने महिलेला बेदम मारहाण केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. पोलीस स्टेशनमध्येच भाजप नेत्याने महिलेला मारहाण केली आहे. शिवा तायडे (Shiva Taide) असं या भाजप नेत्याचं नाव असल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

Mandavagan News । वॉटर शेड संस्थेच्या वतीने मांडवगण येथे तीन हजार वृक्षांचे वृक्षारोपण

सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, “भाजपचा स्थानिक पुढारी तथा मलकापूर जी बुलढाण्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती शिवा तायडे या गावगुंडाकडून शहरातील पोलीस स्टेशन मध्येच महिलेला मारहाण. थोर ते गृहमंत्री.. थोर ते पोलीस कर्मचारी” सध्या त्यांनी शेअर केला हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

Administrative Reshuffle in Maharashtra । विधानसभा निवडणुकीपूर्वी बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या करण्यात आल्या बदल्या

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ” भाजप नेते शिवा तायडे पोलीस स्टेनमध्ये बाकड्यावर बसलेल्या महिलेला मारहाण करत असल्याचे दिसत आहे. या महिलेच्या डोक्यावर मारताना आणि तिला खेचताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. यामध्ये पोलिसांनी मध्यस्थी केली मात्र तरीदेखील शिवा तायडे त्या महिलेला मारहाण करतच राहिले.

Vinesh Phogat Final Match । मोठी बातमी! विनेश फोगाटची सेमीफायनलला धडक

Spread the love