Bjp । भाजपला मोठा धक्का! निवडणुकीच्या तोंडावर बड्या नेत्यावर गुन्हा दाखल

Bjp

Bjp । लोकसभेच्या निवडणुका (Loksabha election) काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, आज निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीच्या तारखा (Loksabha election date) जाहीर करणार आहे. निवडणुकीची घोषणा होताच देशात आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. बड्या नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest marathi news)

Petrol- Diesel Price । ब्रेकिंग! निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त; जाणून घ्या नवीन दर

कोर्टाने मुंबई महानगरपालिका निवडणुकीत बोगस जात प्रमाणपत्र (Bogus caste certificate) वापरल्याने भाजपचे नेते मुरजी पटेल (Murji Patel) यांना दोषी ठरवले आहे. याप्रकरणी शाहूनगर पोलिसांनी मुरजी पटेल यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल केला असून लवकरच त्यांना अटक केली जाईल. या कारवाईमुळे भाजपला मोठा धक्का बसला असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Lok Sabha Election 2024 Date । प्रतीक्षा संपेल! EC आज लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकते, जाणून घ्या कसे असेल वेळापत्रक

Ads

दरम्यान, २०१७ साली मुरजी पटेल यांनी अंधेरी पूर्व प्रभाग क्रमांक ८१ मधून महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी खोटे जात प्रमाणपत्र वापरले असा आरोप विरोधकांनी केला होता. सुनावणीदरम्यान, कोर्टात मुरजी पटेल यांनी निवडणुकीत जातीचे बोगस प्रमाणपत्र वापरले सिद्ध झाले. तसेच मुरजी पटेल यांनी निवडणूक अर्जासोबत बनावट जात प्रमाणपत्राच्या वैधतेसाठी वडिलांच्या शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्म प्रमाणपत्र दिले होते.

Mamata banerjee injured । ब्रेकिंग! ममता बॅनर्जींच्या कपाळाला मोठी गंभीर दुखापत; रुग्णालयातील फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Spread the love