Mamata banerjee injured । ब्रेकिंग! ममता बॅनर्जींच्या कपाळाला मोठी गंभीर दुखापत; रुग्णालयातील फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Mamata banerjee injured

Mamata banerjee injured । पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. डोक्याला दुखापत झाल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. टीएमसीने मुख्यमंत्री जखमी झाल्याचे चित्रही शेअर केले आहे. टीएमसीने लिहिले की, आमचे अध्यक्ष गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. असं ट्विट करत आव्हान करण्यात आले आहे.

Ads

Viral News । धक्कादायक! महिलेने स्वत: विरुद्ध दिशेने कार आणली, आणि धडक झाल्यावर तरुणालाच केली चप्पलने मारहाण

लोकसभा निवडणूक जवळ आल्या आहेत. ममता बॅनर्जी यांच्याकडून मेदवारांची घोषणादेखील करण्यात आली असून बंगालमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. असं असताना आता ममता बॅनर्जी यांच्या दुखापतीची बातमी समोर आली आहे.यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, ममता यांना एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Vasant More । वसंत मोरेंनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

केजरीवाल यांनी प्रार्थना केली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गंभीर दुखापतीबद्दल चिंता व्यक्त केली असून त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. केजरीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले आहे की, हे पाहून ते चिंतेत आणि अस्वस्थ आहेत. तुम्ही लवकर र बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. असं केजरीवाल यांनी म्हंटल आहे.

Eknath Shinde । एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का! लोकसभा निवडणुकीपूर्वी बड्या नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

Spread the love