Bull Attack Video । हृदयद्रावक घटना! मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्धावर बैलाचा हल्ला, आजोबा जागीच ठार; पाहा भयानक व्हिडीओ

Viral Video

Bull Attack Video । रस्त्यावर बऱ्याचदा मोकाट जनावरे फिरतात यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. बऱ्याचवेळा मोकाट जनावरे लोकांवर प्राणघातक हल्ला देखील करतात. सध्या देखील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील बरेली येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कॉलनीत मॉर्निंग वॉकला निघालेल्या वृद्धावर एका बैलाने हल्ला केला, त्यात वृद्धाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Manoj jarange Patil । “…तोपर्यंत मुंबईतून जाणार नाही, जरांगेंकडून सरकारला पुन्हा अल्टिमेटम

या घटनेमुळे तेथील परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वृद्ध बेशुद्ध झाल्यानंतरही बैलाने हल्ला सुरूच ठेवला. लोकांनी पाहताच बैलाचा पाठलाग केला. ही घटना बारादरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संजय नगर परिसरात घडली.

Ajit Pawar and Parth Pawar | पार्थ पवार यांची गजा मारणेबरोबर भेट, अजित पवारांची प्रतिक्रिया काय?

मिळालेल्या माहितीनुसार, संजय नगर भागातील सेंट्रल स्टेट कॉलनीत 60 वर्षीय सेवानिवृत्त ऊस व्यवस्थापक बुधवारी सकाळी घरून फिरायला जात होते. बुधवारी सकाळी आठ वाजता नेहमीप्रमाणे घराजवळील रस्त्यावर फेरफटका मारत होते. तेवढ्यात बैल धावत आला आणि त्याने हल्ला केला. बैलाच्या हल्ल्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी पडले. त्यानंतरही बराच वेळ बैल हल्ला करत राहिला. लोकांनी बघितल्यावर कसा तरी तेथून बैलाचा पाठलाग केला. यांनतर कर्मचाऱ्याला दवाखान्यात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Maratha Reservation । सरकारकडून सर्व मागण्य मान्य? जरांगे पाटील २ वाजता मोठी घोषणा करणार

Spread the love