Maratha Reservation । सरकारकडून सर्व मागण्य मान्य? जरांगे पाटील २ वाजता मोठी घोषणा करणार

Manoj Jarange Patil

Maratha Reservation । मागच्या अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. लाखो मराठा बांधव राजधानी मुंबईत दाखल झाले यानंतर मनोज जरांगे यांच्यासह मराठा बांधव मुंबईतील आझाद मैदानवर जाण्यावर ठाम होते. मात्र त्याआधीच मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

Maratha Reservation । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्या मान्य? जरांगे पाटील वाचून दाखवणार जीआर

मनोज जरांगे पाटील यांची सरकारसोबत आज मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्याचबरोबर जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचे शिष्टमंडळ आणि वकिलांसोबत देखील चर्चा केली आहे. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी वाशी या ठिकाणी छत्रपती शिवाजीनगर चौकात सभा घेतली मात्र यावेळी साउंडचा प्रॉब्लेम असल्यामुळे आवाज सर्वांपर्यंत पोहोचू शकत नव्हता. यामुळे जरांगे पाटील यांनी पुन्हा दोन वाजता सभेचे नियोजन केले आहे.

Ajit Pawar । “ठाकरे सरकार जात होतं तेव्हाच आम्ही…”, अजित पवार यांनी केला सर्वात मोठा गौप्यस्फोट

आपल्याला काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करायची आहे. माझ्या सर्व मराठा बांधवांना सरकारने दिलेली कागदपत्रे वाचून दाखवणार आहे. आपण मोकळे माघारी जाणार नाही. असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. सर्वांना आवाज गेला पाहिजे गैरसमज नको म्हणत साऊंड सिस्टिमची व्यवस्था झाल्यानंतर दोन वाजता याबाबत जाहीर सभा होणार आहे. आणि या सभेत मनोज जरांगे पाटील घोषणा करणार असल्याचेही सांगितले आहे.

Mumbai Fire News । मुंबईत ग्रँट रोडवरील कामाठीपुरा परिसरात भीषण आग; नागरिकांची मोठी धावपळ

Spread the love