Ajit Pawar and Parth Pawar | पार्थ पवार यांची गजा मारणेबरोबर भेट, अजित पवारांची प्रतिक्रिया काय?

Ajit Pawar and Parth Pawar

Ajit Pawar and Parth Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजानन मारणे याची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून अनेक तर्कवितर्क देखील लावले जात आहेत. विरोधकांकडून देखील जोरदार टीका होऊ लागली आहे. कारण कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्या प्रकरणात मारणे टोळीचा मोहरक्या गजा उर्फ गजानन मारणे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Maratha Reservation । सरकारकडून सर्व मागण्य मान्य? जरांगे पाटील २ वाजता मोठी घोषणा करणार

गजानन मारणे (Gajanan Marne) चर्चेत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गजानन मारणे यांची भेट घेतल्यामुळे सध्या सगळीकडे याची चर्चा सुरू झाली आहे. आता या प्रकरणावर अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी स्वतःच्या मुलास फटकारले आहे. असे अजिबात घडता कामा नये याबाबत मी पार्थशी लवकरच बोलणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

Maratha Reservation । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्या मान्य? जरांगे पाटील वाचून दाखवणार जीआर

पहा काय म्हणाले अजित पवार?

पार्थ आणि गजा मारणे यांची भेट झाली ही अत्यंत चुकीची घटना आहे. याबद्दल मी पार्थ सोबत बोलणार आहे. हा जो प्रकार घडला आहे तो अजिबात घडता कामा नये. पार्थ सोबत माझी भेट झाल्यावर त्याला मी याबाबत सांगणार आहे. माझ्याकडून देखील अशी घटना घडली होती मात्र ज्यावेळी मला याबाबत माहिती समजली त्यावेळी त्या व्यक्तीला पक्षातून काढले. अशी आठवण अजित पवार यांनी सांगितली.

Ajit Pawar । “ठाकरे सरकार जात होतं तेव्हाच आम्ही…”, अजित पवार यांनी केला सर्वात मोठा गौप्यस्फोट

Spread the love