पुण्यात नवले ब्रिजजवळ सतत अपघात होत आहेत. अपघाताच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाहीत. या ब्रिजजवळ कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत अपघात होतायेत. आता पुन्हा एकदा या मार्गावर अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबई-बंगळुरू महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने विचित्र अपघात झाला आहे (Accident near Navle Bridge in Pune)
ब्रेकिंग! लवकरच महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार, हवामान विभागाची माहिती
रविवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास नऱ्हे येथील सेल्फी पॉइंटजवळ (Selfie point at Narhe) हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये ४ चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहनने रस्त्यावर असल्याने वाहतूक कोंडी झाली होती. मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
तरुणी बाईकवर दोन्ही हात सोडून व्हडिओ काढत होती, मात्र काही वेळातच… व्हिडीओ पाहून बसेल धक्का