Kuljit Pal Passed Away । प्रसिद्ध चित्रपट निर्माते कुलजीत पाल (Kuljit Pal) यांनी वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडवर (Bollywood) शोककळा पसरली आहे. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. 24 जून रोजी मुंबईत त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्यावर आज सांताक्रूझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. (Latest Marathi News)
धमाकेदार ऑफर! अवघ्या 999 रुपयांना घरी आणा वनप्लस, सॅमसंगचे 5G फोन, कसं ते जाणून घ्या
त्यांनी ‘अर्थ’, ‘आज’, ‘परमात्मा’ तसेच ‘वासना’, ‘दो शिकारी’ आणि ‘आशियाना’ यासारख्या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांनी ‘आज’ सिनेमात अक्षय कुमारचा मार्शल आर्ट ट्रेनर म्हणून काम केले आहे. त्यांनीच बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रेखा (Rekha) यांना पहिला ब्रेक दिला होता. आता त्यांची मुलगी अनु पाल चित्रपटसृष्टीत झळकणार आहे.
लगीनघरात घडलं भयानक! नवरा- नवरीसह ५ जणांची निर्घृण हत्या; परिसरात उडाली खळबळ
दरम्यान कुलजीत पाल यांचे मॅनेजर संजय पाल (Sanjay Pal) यांनी, त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकारा झटका आहे असे सांगितलं आहे. परंतु त्यांच्या निधनाची बातमीने चित्रपटसृष्टीला आणि चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.
सावधान! पुण्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा; हवामान विभागाची मोठी माहिती