75 व्या वर्षी तिला हवा होता जोडीदार पण… लग्नाच्या नावाखाली महिलेची लाखो रुपयांची फसवणूक

crime news

प्रत्येकाला समजावून घेणाऱ्या आणि समजावून सांगणाऱ्या जोडीदाराची गरज असते. उतारवयात तर जोडीदाराची साथ खूप महत्त्वाची असते. सध्याच्या काळात अनेकजण उतारवयात लग्न करत आहेत. परंतु, फसवणुकीचे प्रमाण देखील खूप वाढले आहे. अशीच एक घटना घडली आहे. 75 वर्षीय महिलेची लग्नाच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली आहे. (Crime news)

Kuljit Pal Passed Away । ब्रेकिंग! चित्रपटसृष्टीवर शोककळा, प्रसिद्ध निर्मात्याचे निधन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना माटुंगा (Matunga) येथे घडली आहे. फसवणूक झालेली महिला माटुंग्यात फाइव्ह गार्डन्स येथे पॉश वस्तीत एकटी राहते. आरोपीने तिला ख्रिस पॉल (Chris Paul) जर्मन नागरिक असून आपण खूप श्रीमंत असून पत्नीचे निधन झाल्याने दुसरे लग्न करायचे आहे. नोव्हेंबर महिन्यात या महिलेला आंतरराष्ट्रीय नंबरवरुन फोन करून त्याने महागड्या भेटवस्तू पाठवल्या आहेत असे सांगितले. (Latest Marathi News)

धमाकेदार ऑफर! अवघ्या 999 रुपयांना घरी आणा वनप्लस, सॅमसंगचे 5G फोन, कसं ते जाणून घ्या

मी भारतात आलो असून कस्टम ड्युटी भरण्यासाठी 8 लाख रुपये बँक खात्यात ट्रान्सफर करायला लावले. त्यानंतरही त्या महिलेला पैसे पाठवायला सांगत तिची एकूण 12 लाखांची रक्कम घेतली. त्यानंतर त्या महिलेला आपली फसवणूक झाल्याचे समजले. तिने याप्रकरणी माटुंगा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी थिंग्यो रिंगफामी ( वय 26) आणि सोलान (वय 22) या दोन मणिपुरी तरुणांना अटक केली असून फरार असलेल्या नायजेरियन आरोपींचा शोध सुरु आहे.

लगीनघरात घडलं भयानक! नवरा- नवरीसह ५ जणांची निर्घृण हत्या; परिसरात उडाली खळबळ

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *