सध्या अपघाताच्या (accident) घटनांचे प्रमाण वाढत चालले आहे. जसे रस्ते चांगले होत आहेत तसे अपघात देखील वाढत आहेत. रस्ते चांगले असल्याने गाड्यांचे स्पीड देखील जोरात असते त्यामुळे बरेच अपघात होतात. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने, गाडीचा टायर फुटल्याने, तसेच जनावर आडवे गेल्याने बरेच भीषण अपघात होतात. सध्या देखील एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
ब्रेकिंग! पुण्यातील वाकडमध्ये मुसळधार पाऊस; पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी
गोंदिया जिल्ह्यातून मुंबई – हावडा राष्ट्रीय महामार्ग जातो या महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. ट्र्क आणि दुचाकींचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये बापलेकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अनेकांनी या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली आहे.
देवरीजवळील डोंगरगाव या गावाजवळ हा अपघात झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की त्यांच्या शरीराचा अक्षरशा चेंदामेंदा झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आता पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे.