मागच्या पाच सहा दिवसापूर्वी सांगली शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नालसाब मुल्ला (Nalsab Mulla) यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला होता. गोळीबाराच्या या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण शहर हादरलं आहे. त्यांच्यावर 8 गोळ्या झाडल्या असल्याने त्यांचा मृत्यू झाला. आता या प्रकरणाबाबत नवीन अपडेट समोर आली आहे.
‘अजितदादांना विरोधीपक्षनेते पद नकोय’; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “तुमच्या सर्व इच्छा…”
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नालसाब मुल्ला खून प्रकरणी पोलिसांनी आणखी तिघांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयाने या तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. माहितीनुसार, संशयित तिघेजण हे नालसाब मुल्ला यांचा खून झाला त्यावेळी घटनास्थळी उपस्थित होते. आत्तापर्यंत या प्रकरणी एकूण ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! दर्शना पवार खून प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल हांडोरेला अटक
दरम्यान, सचिन डोंगरे या जेलमध्ये असलेल्या गुन्हेगाराला जामीन न होऊ देण्यासाठी नालसाब मुल्ला प्रयत्न करत असल्याच्या कारणातून त्यांची हत्या करण्यात आली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.
दर्शना पवार हत्याकांडप्रकरणी मराठा समाज आक्रमक; अहमनगरमध्ये मोठा मोर्चा
नालसाब मुल्ला यांची पार्श्वभूमी पाहिली तर त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची राहिली आहे. अलीकडील काळात ते राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. मात्र त्यांच्या विरोधात अनेक गंभीर गुन्ह्यांची देखील नोंद आहे. माहितीनुसार, नालसाब हे शनिवारी रात्री आपल्या राहत्या घराच्या बाहेर बसले होते. यावेळी अज्ञात त्यांच्या घराजवळ आले. त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली अन् त्यावेळी त्या अज्ञात लोकांनी गोळ्या झाडल्या आणि नालसाब यांची हत्या केली.