Bjp । भाजपला सर्वात मोठा धक्का! महिला नेता ठोकणार पक्षाला रामराम

Bjp

Bjp । येत्या काहीच दिवसात लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. यामुळे या निवडणुकांच्या पार्श्ववभूमीवर अनेक पक्ष कामाला लागले आहेत. कोणत्या पक्षातून कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सर्व घडामोडी असतानाच अनेक बडे नेते पक्षांतर करत असल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

Sharad Pawar । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर शरद पवार यांनी केली मोठी घोषणा!

भाजपच्या नेत्या ॲड. ललिता पाटील यांना ठाकरे गटात घेण्याबाबत चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. दोन दिवसातच ललिता पाटील यांचा शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचबरोबर ललिता पाटील याना लोकसभेला उमेदवारीही दिली जाण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Pune Crime । धक्कादायक! लग्नानंतर समजलं नवऱ्याचं सत्य, बायकोने घेतला टोकाचा निर्णय

जर ललिता पाटील यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला तर जळगावमधून लोकसभेसाठी त्यांचं नाव निश्चित होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ॲड. ललिता पाटील या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर भाजपच्या पदाधिकारी आहेत. ललिता पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली आहे. त्यामुळे लवकरच त्या ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

Nagpur News । परीक्षेच्या दबावामुळे आणखी एका मुलाची आत्महत्या, दहावीच्या विद्यार्थ्याने गळफास लावून घेतला शेवटचा श्वास

Spread the love