Pune Crime । धक्कादायक! लग्नानंतर समजलं नवऱ्याचं सत्य, बायकोने घेतला टोकाचा निर्णय

Marrige

Pune Crime । पुणे : कोणत्या ना कोणत्या कारणावरून नवरा आणि बायकोची सतत भांडणे होत असतात. यातील काही भांडणे लगेचच मिटतात पण काही भांडणे खूप टोकाला जातात. काही भांडणात पोलिसांना मध्यस्थी करावी लागते. पण रागाच्या भरात कधीकधी पती-पत्नी टोकाचे पाऊल उचलतात. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे.

Nagpur News । परीक्षेच्या दबावामुळे आणखी एका मुलाची आत्महत्या, दहावीच्या विद्यार्थ्याने गळफास लावून घेतला शेवटचा श्वास

हल्ली अनेकजण समलैंगिक विवाह करत आहेत. पण यातून एक गुन्हा घडला आहे. लग्नानंतर आपला नवरा समलैंगिक असल्याचे लक्षात येताच पत्नीला खूप मोठा धक्का बसला. धक्कादायक बाब म्हणजे तिला याबद्दल कोणतीच माहिती नव्हती. आपली फसवणूक झाल्याचे तिला समजले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. याबाबत तिने सासू-सासर्यांना जाब विचारला.

Lok Sabha Election । ब्रेकिंग! महायुतीतील जागावाटपाबाबत आतली बातमी आली समोर

या प्रकारानंतर पीडितेला सासु-सासऱ्यांनी मानसिक आणि शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. तिच्यावर कार तसेच माहेरुन पैसे आणण्यासाठी दबाव टाकण्यात आला. दिवसेंदिवस ही मागणी वाढत गेली. सर्व प्रकाराला कंटाळून फिर्यादी महिलेने नवरा आणि सासरच्यांविरोधात पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली.याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Samruddhi Mahamarg Accident । भयानक अपघात! समृद्धी महामार्गावर कार-ट्रकचा भीषण अपघात; २ जण जागीच ठार

Spread the love