Lok Sabha Elections । बिग ब्रेकिंग! अजितदादांची अमित शहांकडे लोकसभेसाठी ‘इतक्या’ जागांची मागणी

Lok Sabha Elections

Lok Sabha Elections । केंद्रीय निवडणूक आयोग (Central Election Commission) कधीही निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकते. सर्व पक्ष निवडणुकांची तयारी करताना दिसत आहेत. यंदाची निवडणूक अटीतटीची असणार आहे, कारण दोन मोठे पक्ष फुटले आहेत. दरम्यान, महायुतीमध्ये अजूनही जागावाटपाचा तिढा सुटला नाही. घटक पक्षांना अपेक्षित जागा मिळत नसल्याने नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. (Latest marathi news)

Sharad Pawar । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर शरद पवार यांनी केली मोठी घोषणा!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) कमी जागा मिळतील अशी चर्चा सुरु आहे. लोकसभेसाठी अजित पवार गट सात ते आठ जागांसाठी आग्रही असून त्यापैकी कमीत कमी सहा जागा आपल्याला मिळाव्यात अशी त्यांची अपेक्षा आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि सुनिल तटकरे यांनी शिरूर, सातारा, रायगड, परभणी, बारामती, गडचिरोली आणि बुलढाणा या जागांसाठी आग्रही भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Pune Crime । धक्कादायक! लग्नानंतर समजलं नवऱ्याचं सत्य, बायकोने घेतला टोकाचा निर्णय

पण साताऱ्याची जागा भाजपाला पाहिजे आहे तर गडचिरोली येथे भाजपा चिन्हावर राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री बाबाराम आत्राम यांना उमेदवारी द्यावी अशी भूमिका घेतली जात आहे. पण राष्ट्रवादीचे नेते त्यास अनुकूल नाहीत. परभणी येथे राष्ट्रवादीचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांच्यासाठी अजित पवार आग्रही आहेत. त्यामुळे आता या जागांचा तिढा कसा सुटणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Nagpur News । परीक्षेच्या दबावामुळे आणखी एका मुलाची आत्महत्या, दहावीच्या विद्यार्थ्याने गळफास लावून घेतला शेवटचा श्वास

Spread the love