बिहारमध्ये दररोज अनेक गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. सध्या बिहारमधील (Bihar) खगरिया या ठिकाणचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती एका महिलेला घोड्याला मारण्यासाठी वापरल्या जाणार्या चाबकाने मारहाण करताना दिसत आहे. त्याचबरोबर त्या महिलेला शिवीगाळ देखील करत आहे. (Latest Marathi News)
Nitin Gadkari On Congress । ‘एकवेळ विहिरीत उडी मारून जीव देईल पण काँग्रेसमध्ये कदापि जाणार नाही’
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खगरियाचे एसपी अमितेश कुमार यांनी त्याची दखल घेत बेलदौर पोलीस स्टेशनला याप्रकरणी कारवाई करण्यास सांगितले. त्यांनी गुन्हा दाखल करून स्थानिक पोलीस ठाण्याला कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.
ब्रेकिंग! अयोध्या पोळ मारहाण प्रकरणी समोर आली मोठी अपडेट
याबाबत बोलताना अमितेश कुमार म्हणाले की, व्हॉट्सअॅप ग्रुप आणि पत्रकारांच्या माध्यमातून हा व्हिडिओ मिळाला आहे. त्यात एक पुरुष एका महिलेला मारहाण करताना दिसत आहे. महिलेचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Ashok Saraf Nilu Phule । ‘निळूभाऊंनी माझा नादच सोडला’ अशोक सराफ यांचं वक्तव्य