ठाकरे गटाच्या महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ (Ayodhya Paul) यांच्यावर ठाण्यात शाई फेक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातल्या कळवा या ठिकाणी ही घटना घडली आहे. अयोध्या पोळ यांच्यावर फक्त शाईफेकच नाही तर त्यांना मारहाण देखील करण्यात आली आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)
Supriya Sule | अजित पवार हे महाराष्ट्राचे अमिताभ बच्चन; सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य
शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास कळवा येथे ही घटना घडली आहे. ‘सामना ऑनलाईन’ या ट्वीटर अकाऊंटवर याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. “शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांच्यावर कळव्यात टोळक्याची भ्याड शाईफेक – एका कार्यक्रमासाठी कळव्यात आलेल्या अयोध्या यांना काही जणांच्या टोळक्याने घेरले आणि शाई फेकली”. असं ट्विट करण्यात आलं आहे.
धक्कादायक! नवऱ्यानं भररस्त्यात बायकोला पेट्रोल टाकून पेटवलं; थरकाप उडवणारी घटना
अयोध्या पोळ या एका कार्यक्रमासाठी कळवा या ठिकाणी उपस्थित होत्या यावेळी त्यांना काही जणांनी घेरलं आणि शाईफेक केली. त्याचबरोबर मारहाण देखील केली आहे. आता या प्रकरणी अयोध्या पोळ यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.