वारकऱ्यांवर झालेल्या लाठीमाराची घटना मनाला दुःख देणारी, अजित पवार संतापले

Ajit Pawar was furious after the incident of lathicharge on the workers was heart-wrenching

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या (Sant Dnyaneshwar Maharaj) पालखीचे काल प्रस्थान झाले आहे. या पालखी सोहळ्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली आहे. अनेकजण या पालखी सोहळ्यामध्ये सामील होऊन लोक भक्तिमय वातावरणात रमून जातात. अगदी तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वजण यामध्ये सामील होतात. मात्र काल या पालखीला सोहळ्याला गालबोट लागणारी घटना समोर आली आहे.

ब्रेकिंग! लवकरच महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार, हवामान विभागाची माहिती

वारकरी आणि पोलीस आमने-सामने आले. यावेळी लाठीचार्ज झाल्याचा आरोप करण्यात आले आहेत. त्याचबरोबर याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यानंतर राज्याचे वातावरण देखील चांगलेच तापले. अनेक नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. यामध्येच आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील या मुद्द्यावरून संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे.

मोठी बातमी! पुण्यात नवले ब्रिज जवळ भीषण अपघात; ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले अन्..

ट्विट करत अजित पवार म्हणाले, “संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखीच्या आळंदीहून प्रस्थान सोहळ्यावेळी वारकरी बांधवांवर झालेल्या पोलीस लाठीमाराची घटना क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या संत, भक्तीपरंपरेचं वैभव असलेल्या पंढरपूर वारीच्या इतिहासात असं यापूर्वी घडलं नव्हतं. आजची घटना मनाला दु:ख देणारी आहे. सोहळ्याचं योग्य नियोजन करुन हा प्रसंग टाळता आला असता, परंतु तसं घडलं नाही. वारकऱ्यांवरील पोलीस लाठीमाराचा आणि लाठीमार करणाऱ्या सरकारचा मी तीव्र शब्दात निषेध करतो.”

मोठी बातमी! ब्रिज भूषण सिंह यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार; पोलिसांनी मागितले कुस्तीपटूंना फोटो ऑडिओ व्हिडिओचे पुरावे

महाराष्ट्राला पंढरपूरच्या आषाढी वारीची गौरवशाली परंपरा आहे. आषाढी वारी आणि आळंदीहून निघणारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हे आपल्या महाराष्ट्राच्या अध्यात्म, भक्ती परंपरेचं वैभव आहे. दरवर्षी वारीसाठी हजारो वारकरी आळंदीत येतात. वारी आणि प्रस्थान सोहळ्याचं योग्य नियोजनही केलं जातं. वारकरीही या नियोजनाला सहकार्य करत असतात. परंतु यंदा कुठेतरी चूक घडलेली दिसत आहे. प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे हे घडल्याचं दिसत आहे. ही संपूर्ण घटना दु:खदायक, तशीच मनाला चीड आणणारी आहे. अशी घटना यापुढे घडू नये, यासाठी पूर्ण काळजी घेण्यात यावी.

तरुणी बाईकवर दोन्ही हात सोडून व्हडिओ काढत होती, मात्र काही वेळातच… व्हिडीओ पाहून बसेल धक्का

कुठल्याही आध्यात्मिक कार्यात आणि पंढरपूर वारीसारख्या सोहळ्यात सहभागी होताना, सर्वांनी राजकीय हेतू बाजूला ठेवावा. ईश्वरभक्ती आणि वारकऱ्यांची सेवा हाच हेतू मनात ठेवून वारीत सहभागी व्हावं, असं आवाहन आहे. असं ट्विट अजित पवार यांनी केलं आहे. सध्या हे ट्विट चर्चेत आहे.

तरुणी बाईकवर दोन्ही हात सोडून व्हडिओ काढत होती, मात्र काही वेळातच… व्हिडीओ पाहून बसेल धक्का

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *