
Onion Rate । दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी कांद्याच्या किमती (Onion Price) चांगल्याच कोलमडल्या आहेत. बाजारभावाविना शेतकऱ्यांवर कांदा अक्षरशः फेकून देण्याची वेळ आली आहे. अशातच केंद्र सरकारने (Central Govt) कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावले आहेत. सरकारच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सरकारने २ लाख मेट्रिक टन कांदा २,४१० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)
Sharad Pawar । लवकरच अजित पवार रिटर्न्स भाग-२ पाहायला मिळेल, काँग्रेस नेत्याच्या विधानाने खळबळ
यानंतरही कांद्याच्या दरात कमालीची घसरण (Onion Price Falls Down) झाली आहे. अहमदनगर, घोडेगाव, राहुरी बाजार समितीत ४० टक्के निर्यात शुल्काच्या (Onion Export Duty) निर्णयानंतर कांद्याचे दर तीनशे ते चारशे रुपयांनी घसरले आहेत. त्याशिवायही त्याच्या आवकेतही पन्नास टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे.
दरम्यान, निर्यातकर वाढीच्या निर्णयापूर्वी कांद्याला २०० रुपयांपासून कमाल २८०० रुपयांपर्यंत आणि सरासरी १४०० ते १६०० रुपये दर मिळत होते. परंतु केंद्राच्या निर्णयानंतर २०० रुपयांपासून कमाल २ हजार ते २२०० रुपयांपर्यंत आणि सरासरी १३०० रुपयांपर्यंत दर पाहायला मिळत आहेत. कोपरगाव बाजार समितीसह इतर बाजार समित्यातही ५० टक्क्यांनी आवक कमी झाली आहे.
Virat Kohli । विराट कोहलीच्या ‘त्या’ कृतीवरून BCCI चा टोकाचा निर्णय, सर्व खेळाडूंसाठी काढले आदेश
कांद्याला शुक्रवारी २०० रुपयांपासून २९०० रुपयांपर्यंत दर मिळाले होते. तर शनिवारी निर्यात शुल्क वाढीचा निर्णय लागू झाल्यानंतर हा दर २५०० रुपयांवर आले आहेत. त्याचा आवकतेवरही मोठा परिणाम झाला आहे. जर येत्या काळातही दरात घसरण झाली तर शेतकऱ्यांवर मोठे संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.