Sharad Pawar । लवकरच अजित पवार रिटर्न्स भाग-२ पाहायला मिळेल, काँग्रेस नेत्याच्या विधानाने खळबळ

Ajit Pawar Returns Part-2 will be seen soon, Congress leader's statement stirs excitement

Sharad Pawar । अजित पवार (Ajit Pawar) यांनी राजकीय वर्तुळात सर्वात मोठा भूकंप घडवून आणला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह ठाकरे गट आणि काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. राज्यात लवकरच आणखी एक भूकंप येणार असल्याचे मत सर्व पक्षांकडून वर्तवला जात आहे. अशातच आता काँग्रेस नेत्याने लवकरच अजित पवार रिटर्न्स भाग-२ पाहायला मिळेल, असा दावा केला आहे. (Latest Marathi News)

Crime News | माणुसकीला काळिमा! मालकाने शिवले घोड्यांचे प्रायव्हेट पार्ट, कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का

खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि शरद पवार यांनी नुकतेच अजित पवार हे आमचेच नेते असल्याचे म्हटले आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेले नेते शरद पवारांना भेटतात त्यांच्या पाया पडतात. आता महाराष्ट्राला आणि देशाला अजित पवार रिटर्न्स भाग- २ लवकरच पाहायला मिळेल, असा दावा काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Virat Kohli । विराट कोहलीच्या ‘त्या’ कृतीवरून BCCI चा टोकाचा निर्णय, सर्व खेळाडूंसाठी काढले आदेश

दरम्यान, शरद पवार यांनी काहीही झालं तरी मी भाजपसोबत जाणार नसून मी इंडिया सोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शरद पवार राज्यात वेगवेगळ्या शहरात सभा घेत असतानाच आता अजित पवार यांच्याकडून देखील उत्तर सभांचे आयोजन केले जात आहे. लवकरच बीडमध्ये अजित पवार सभा घेणार असून संपूर्ण राज्याचे त्याकडे लक्ष लागले आहे.

Sharad Pawar । “…तर मुख्यमंत्र्यांचं म्हणणं मान्य करेन”; कांदाप्रश्नावरून शरद पवार यांचे एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर

Spread the love