Agriculture News | अहमदनगर : मागच्या काही दिवसापासून कोथिंबिरीचे भाव घसरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत . यामुळे कोथिंबीर उत्पादक शेतकरी नाराज आहेत. कोथिंबीरीचे उत्पादन सुरू होताच कोथिंबिरीला चांगला भाव मिळाला होता. त्यानंतर शेतकऱ्यांना चांगल्या भावाची आशा होती. मात्र काही दिवसातच कोथिंबिरीचे भाव कोसळले आणि कोथिंबीरला कवडीमोल भाव मिळू लागला. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहिले. अनेक शेतकऱ्यांनी कोथिंबिरीमध्ये रोटावेटर फिरवल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. दरम्यान सध्या देखील एका शेतकऱ्याने कोथिंबिरीमध्ये रोटर फिरवल्याची माहिती समोर आली आहे.
Onion Rate । शेतकऱ्यांना मोठा फटका! निर्यात शुल्क वाढीनंतर कांद्याच्या दरात कमालीची घसरण
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रांदे गावच्या एका शेतकऱ्याने एकर कोथिंबिरीवर ट्रॅक्टरने रोटर फिरवल्याची माहिती समोर आली आहे. गोरख आवारी असे या शेतकऱ्याचे नाव आहे. कोथिंबीरीला कवडीमोल दरात भाव मिळत होता. उत्पादन खर्चही निघत नव्हता यामुळे संतापलेल्या शेतकऱ्याने थेट टोकाचा निर्णय घेत एकर कोथिंबिरीत रोटर फिरवला आहे. (Coriander price)
Sharad Pawar । लवकरच अजित पवार रिटर्न्स भाग-२ पाहायला मिळेल, काँग्रेस नेत्याच्या विधानाने खळबळ
याबाबत बोलताना शेतकरी म्हणाले, शेतमालाला भाव नाही, पाऊसही वेळेवर पडत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी जगाव की मराव? सरकारने लवकरात लवकर हमीभाव ठरवून दिला पाहिजे नाहीतर एक दिवस उपाशी राहण्याची वेळ येईल असं देखील शेतकरी आवारी म्हणाले आहेत.
दरम्यान, नाशिक मधील देखील एका शेतकऱ्याने कोथिंबिरीला भाव नसल्याने कोथिंबीर फुकट वाटली होते. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांने भाव मिळत नसल्याने शहरातील दिंडोरी नाका परिसरामध्ये कोथिंबीर फुकट वाटली होती. यामुळे कोथिंबीरच्या दरावरून सध्या कोथिंबीर उत्पादक शेतकरी नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Virat Kohli । विराट कोहलीच्या ‘त्या’ कृतीवरून BCCI चा टोकाचा निर्णय, सर्व खेळाडूंसाठी काढले आदेश