Crime News | माणुसकीला काळिमा! मालकाने शिवले घोड्यांचे प्रायव्हेट पार्ट, कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का

Darkness to humanity! The owner sewed the private parts of the horses, because you will be shocked to know

Crime News | सांगली : घोड्यांची शर्यत (Horse race) हा सर्वात खेळांपैकी प्राचीन खेळ आहे. आजही अनेक ठिकाणी घोड्यांची शर्यत होत असते. फक्त देशांतर्गत नाही तर अनेक जिल्ह्यातही घोड्यांची शर्यत आयोजित करण्यात येते. महत्त्वाचे म्हणजे शर्यतीनंतर घोड्यांना चरण्यासाठी सोडले जाते. त्यावेळी घोडे मॅटिंग करतात. परंतु एका ठिकाणी चक्क घोड्यांचे प्रायव्हेट पार्ट ताब्यांच्या तारेने शिवल्याची घटना घडली आहे. (Latest Marathi News)

Virat Kohli । विराट कोहलीच्या ‘त्या’ कृतीवरून BCCI चा टोकाचा निर्णय, सर्व खेळाडूंसाठी काढले आदेश

मिळालेल्या माहितीनुसार, या धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यात घडला आहे. घोड्यांच्या मालकाने चार घोडींचा प्रायव्हेट पार्ट ताब्यांच्या तारेने शिवला आहे. त्यानंतर या घोडी प्रचंड रक्तबंबाळ झाल्या. त्यानंतर या मालकाने या घोडींना सांगलीतील एका रुग्णालयाजवळ सोडून पळ काढला. स्वयंसेवी संस्थानी जखमी घोडींना रुग्णालयात दाखल केले.

Sharad Pawar । “…तर मुख्यमंत्र्यांचं म्हणणं मान्य करेन”; कांदाप्रश्नावरून शरद पवार यांचे एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर

या चारही घोडींचं वय तीन वर्ष असून कमी वयामुळे त्या चांगली कामगिरी करतात. परंतु ज्या घोडी शिंगरूला जन्म देतात त्यांना जवळपास दोन अडीच महिने स्पर्धेत सहभागी होता येत नाही. त्यामुळे या मालकाने या घोडींचे प्रायव्हेट पार्ट ताब्यांच्या तारेने शिवले आहे. विशेष म्हणजे या मालकाला अजूनही अटक केली नाही. पोलीस त्यांचा तपास घेत आहेत. दरम्यान या पूर्वीही जिल्ह्यात असाच प्रकार घडला होता.

Multibagger Stock । गुंतवणूकदार झाले लखपती! ‘या’ शेअरने दिला जबरदस्त परतावा

Spread the love