Praniti Shinde । काँग्रेसचं ठरलं! सोलापूर मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदेंना उमेदवारी जाहीर; भाजपकडून कोण असणार उमेदवार?

Praniti Shinde

Praniti Shinde । काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली असून सोलापूर मतदार संघातून (Solapur Constituency) काँग्रेसने प्रणिती शिंदे यांना मैदानात उतरविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे प्रणिती शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. काँग्रेसने गुरुवारी रात्री यादी जाहीर केली असून आता प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजपचा कोणता उमेदवार उभा राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ahmednagar Politics । मोठी बातमी! अहमदनगर दक्षिण मतदारसंघात नवा ट्विस्ट

माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तिसऱ्या टप्प्यात होणार आहे. १२ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होणार असून १९ पर्यंत त्यासाठी मुदत आहे. २२ एप्रिल ते ५ मे या काळात उमेदवारांना प्रचारासाठी वेळ मिळणार आहे. आणि ७ मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.

Sharad Pawar । शरद पवार संतापले, त्या घटनेचा केला तीव्र निषेध

महाराष्ट्रातील ‘या’ 7 उमेदवारांची नावे जाहीर

१) पुणे – रवींद्र धंगेकर

२) नंदुरबार – गोवाल पाडवी

३) अमरावती – वळवंत वानखेडे

४) सोलापूर – प्रणिती शिंदे

५) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती

६) लातूर – डॉ. शिवाजी कलगे

७) नांदेड – वसंतराव चव्हाण

Pune Crime । गोळीबाराच्या घटनेनं पुणे पुन्हा हादरलं! गोळीबाराचं कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Spread the love