Instagram वर मैत्री झाली, प्रेमही झालं; हॉटेलवर बोलवलं अन् घडलं धक्कादायक; घटना वाचून हादराल

Instagram

सध्या तरुणाईंमध्ये सोशल मीडिया (Social media) वापरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून जग अगदी जवळ आले आहे. घरबसल्यामुळे अनेक कामे होऊ लागली आहेत. त्यावर पैसेही कमावता येऊ लागले आहेत. जसे सोशल मीडिया वापरण्याचे फायदे आहेत तसेच त्याचे तोटेही (Disadvantages) आहेत. याच्या अतिवापरामुळे गुन्ह्यात वाढ होत आहे. असेच काहीसे प्रकरण सुजनगड (Sujangad) तहसीलच्या ग्रामीण घडले आहे. एका अल्पवयीन मुलीला सोशल मीडिया वापरणे चांगलेच अंगलट आले आहे. (Latest Marathi News)

बिपरजॉयचा हाहाकार थांबता थांबेना! ४ जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती; रुग्णालयात शिरले पाणी

मिळालेल्या माहितीनुसार, सुजनगड तहसीलच्या ग्रामीण भागात एक १६ वर्षीय तरुणी तिच्या विधवा आई आणि मोठ्या बहिणीसोबत राहत होती. तिने तिच्या आईच्या स्मार्टफोनवर इंस्टाग्राम (Instagram) खाते चालू केले. एकेदिवशी इंस्टाग्राम पाहत असताना तिला नागौर जिल्ह्यात राहत असणाऱ्या राजेंद्र उर्फ​राजू या मुलाची रिक्वेस्ट येते. त्यानंतर त्यांची हळूहळू मैत्री वाढू लागते. त्यांचे फोनवर बोलणेही सुरु होते. त्याने त्यांचे अश्लिल संभाषण रेकॉर्ड करून तिला भेटायला ये, नाहीतर ऑडिओ क्लिप व्हायरल करीन अशी धमकी केली.

MPSC पास तरुणीच्या मृत्यूप्रकरणात धक्कादायक खुलासा! पोलिसही चक्रावले

तो तिला शाळेतही कार घेऊन भेटायला यायचा. भेटल्यानंतर एकदा तिच्याच फोनमध्ये राजेंद्रने फोटो काढून तिला पाठवायला सांगितला. अनेकदा फिरायला चल असेही म्हणाला. परंतु पीडितेने नकार देताच त्याचे रागावरील नियंत्रण सुटले. एका आठवड्यानंतर त्याने तिला जबरदस्ती कारमध्ये नेले. त्याने तिच्यावर एका हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केले आणि त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. तसेच जर तिने याबाबत कोणाला माहिती दिली तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. हे सर्व प्रकरण पीडितेने तिच्या आई आणि मामाला सांगितल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्ररीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

लग्नात फोटो काढताना नवरदेवाचा संयम सुटला, पाहुणेमंडळीही संतापली; पाहा व्हायरल व्हिडीओ

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *