‘अर्धवटराव, मी काय म्हणालो, ते पूर्ण ऐकलेच नाही…, फडणवीसांची ठाकरेंवर जहरी टीका

Fadanvis

राजकीय वर्तुळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कायम जुंपल्याचे पाहायला मिळते. जुना व्हिडिओ दाखवत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘अर्धवटराव, मी काय म्हणालो होतो, ते पूर्ण ऐकलेच नाही.. अशी जहरी टीका फडणवीस यांनी ट्विट करत केली आहे.

Instagram वर मैत्री झाली, प्रेमही झालं; हॉटेलवर बोलवलं अन् घडलं धक्कादायक; घटना वाचून हादराल

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून उद्धव ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी फडणवीसांनी केलेल्या कोरोना लसीच्या (Corona vaccine) वक्तव्याचा व्हिडिओ दाखवला. टीका करताना ठाकरे म्हणाले की, ‘यांच्या डोक्यात कुठून व्हायरस घुसला आहे, काय माहिती. कोविडची लस मोदींनी तयार केली, मग बाकीचे काय गवत उपटत होते का?

बिपरजॉयचा हाहाकार थांबता थांबेना! ४ जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती; रुग्णालयात शिरले पाणी

संशोधक गवत उपटत होते का? असे सगळे अंधभक्त आणि त्यांचे गुरू म्हणल्यानंतर यांना कोणतं व्हॅक्सिन द्यायचं ते ठरवावं लागेल. यांना व्हॅक्सिन देण्याची गरज आहे’. त्यावरून फडणवीसांनी त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत एक व्हिडिओ ट्वीटरवर (Twitter) शेअर केला आहे.

MPSC पास तरुणीच्या मृत्यूप्रकरणात धक्कादायक खुलासा! पोलिसही चक्रावले

‘अर्धवटराव, मी काय म्हणालो होतो, ते पूर्ण ऐकलेच नाही… असो, आता ऐका… याच अर्धवटपणामुळे तुम्हाला पानिपत शब्द अलिकडे अधिक आठवायला लागला … म्हणून म्हणतो स्क्रिप्ट रायटर बदला !’, असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

लग्नात फोटो काढताना नवरदेवाचा संयम सुटला, पाहुणेमंडळीही संतापली; पाहा व्हायरल व्हिडीओ

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *