बिपरजॉयचा हाहाकार थांबता थांबेना! ४ जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती; रुग्णालयात शिरले पाणी

Cyclone

महाराष्ट्र (Maharashtra), गुजरातमध्ये (Gujarat) थैमान घातल्यानांतर बिपरजॉय (Beeperjoy) हे विनाशकारी चक्रीवादळ आता राजस्थानकडे (Rajasthan) सरकले आहे. या वादळामुळे राजस्थानमध्ये ४ जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. विजेचे खांब कोसळल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. हवामान खात्याकडून (IMD) सवाई माधोपूर, बुंदी या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर कोटा, बारन तसेच करौली, भिलवाडा आणि टोंकमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. (Latest Marathi News)

MPSC पास तरुणीच्या मृत्यूप्रकरणात धक्कादायक खुलासा! पोलिसही चक्रावले

बचाव पथकाने पुरात अडकलेल्या आतापर्यंत ३० जणांची सुखरूप सुटका केली आहे. राजस्थानमध्ये या पावसामुळे मागील २४ तासांत अनेक ठिकाणी ३०० मिमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत ७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच पावसामुळे अजमेरमधील सरकारी रुग्णालयात पाणी शिरल्याने १८ रुग्णांना दुसऱ्या वॉर्डात हलवण्यात आले आहे.

लग्नात फोटो काढताना नवरदेवाचा संयम सुटला, पाहुणेमंडळीही संतापली; पाहा व्हायरल व्हिडीओ

तसेच या वादळाचा आसामला चांगलाच फटका बसला आहे. हवामान विभागाकडून आसामसाठी पुन्हा अतिसतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला असून, गुरुवारपर्यंत राज्याच्या अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशातच आता हे चक्रीवादळ राजस्थान, गुजरातनंतर हरियाणात धडकले आहे. वातावरणामुळे बदल झाल्याने ताशी ६० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहू लागले, यात कोणतेही नुकसान झाले नाही.

पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय! सुप्रिया सुळे ॲक्शन मोडमध्ये; पोलीस आयुक्तांची भेट घेत केली ‘ही’ मोठी मागणी

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *