Amravati News । बच्चू कडू समर्थक-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, नेमकं कारण आलं समोर

Amravati News

Amravati News । अमरावती : अमरावती येथील चांदूर बाजारमध्ये आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) समर्थक आणि भाजप (BJP) कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. त्यामुळे पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. तरीही दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते ऐकायला तयार नव्हते. (Latest marathi news)

Loksabha Election 2024 । ब्रेकिंग! महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागा लढवणार?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम कामगार कल्याण मंडळातर्फे मजुरांना साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित केला होता.भाजप कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांच्या कार्यक्रमाचे बॅनर फाडले. (Bachchu Kadu Prahar Party BJP Workers Clash) त्यामुळं बच्चू कडू यांचे कार्यकर्ते खूप संतापले. अथक प्रयत्नांनंतर पोलिसांनी दोन्ही पक्षांना शांत केले. कार्यक्रमात गदारोळ करणाऱ्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Crime News । धक्कादायक! उद्धव ठाकरे गटाच्या विभागप्रमुखाच्या मुलाचा दगडाने ठेचून निर्घृण खून

यावेळी कामगारांना उन्हात उभं केलं. या ठिकाणी पिण्याची पाण्याचीही सोया नव्हती, असा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे गैरकारभाराचा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांचे बॅनर फाडले आणि फेकून दिले. यामुळे वातावरण तापले आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली.

Supriya Sule । सुप्रिया सुळेंनी अजित पवारांचे नाव न घेता केले सर्वात मोठे वक्तव्य!

Spread the love