Crime News । धक्कादायक! उद्धव ठाकरे गटाच्या विभागप्रमुखाच्या मुलाचा दगडाने ठेचून निर्घृण खून

Crime News

Crime News । मागील काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचे (Crime) प्रमाण झपाट्याने वाढले आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे. कायदे कठोर करूनही गुन्ह्यांचे प्रमाण कमी होत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशातच आता पुन्हा एक खळबळजनक घटना घडली आहे. (Latest marathi news)

Supriya Sule । सुप्रिया सुळेंनी अजित पवारांचे नाव न घेता केले सर्वात मोठे वक्तव्य!

पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या विभागप्रमुखांच्या मुलाची दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवड पोसिस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या देहूरोड परिसरात ही घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.

Maratha Reservation । सर्वात मोठी बातमी! मराठा आरक्षणामुळे राज्यातील कर्मचारी भरतीत अडथळा?

ठाकरे गटाचे विभाग प्रमुख विजय थोरी (Vijay Thori) यांचा मुलगा विशाल विजय थोरी (Vishal Vijay Thori) याची विशालनगर किवळे भागातील श्री साई दर्शन कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या जवळच अज्ञातांनी दगडाने ठेचून हत्या केली आहे. आरोपींनी विशालचा सिमेंटचा गट्टू आणि लाकडी बांबूने मारहाण करून जीव घेतला आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतलं असून या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

Navneet Rana । मोठी बातमी! नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी, ‘या’ देशांचं कनेक्शन आलं समोर

Spread the love