ठाकरे गटाच्या महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ (Ayodhya Paul) यांच्यावर ठाण्यात शाई फेक करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातल्या कळवा या ठिकाणी ही घटना घडली. अयोध्या पोळ यांच्यावर फक्त शाईफेकच नाही तर त्यांना मारहाण देखील करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास कळवा येथे ही घटना घडली. आता या घटनेनंतर अयोध्या पोळ यांनी याबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)
माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, ठाण्यातील कळवा येथे ठाकरे गटाच्या कार्यक्रमचा बनाव करून मला जाणून बुझून बोलवण्यात आलं होतं. यानंतर मी कार्यक्रमाला गेले त्या ठिकाणी महापुरुषांना हार घातला. मात्र तिथे उपस्थित महिलेने बाबा साहेबांचा अपमान केला म्हणत माझ्यावर शाई फेक आणि मारहाण केली.
कोंबडी अगोदर की अंड? शेवटी सापडलं उत्तर! शास्त्रज्ञांनी केला खुलासा
त्याचबरोबर पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “हे सर्व षडयंत्र करून मला इथे बोलवण्यात आला होता असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्याचबरोबर मी सतत सोशल मीडियावर ठाकरे गटाच्या बाजूने पोस्ट टाकत असते म्हणून माझ्यावर हा हल्ला करण्यात आला असल्याचं त्यांनी म्हंटल आहे.
सेक्स अॅडिक्ट, एड्स अन्… नेमकं घरामध्ये काय सापडलं?; मीरा रोड हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासे