नांदेड । शिवसेनेसोबत बंड करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपसोबत युती केली. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले. तेव्हापासून अजूनही भाजपमध्ये धुसफूस सुरु असल्याचे अनेकदा समोर येत आहे. अशातच काही दिवसांपूर्वी शिंदे यांच्या समर्थकांनी राज्यातील सर्व वर्तमानपत्रात देवेंद्र फडणवीस यांच्या तुलनेत मुख्यमंत्री म्हणून शिंदे जास्त लोकप्रिय असल्याची जाहिरात दिली.
कोंबडी अगोदर की अंड? शेवटी सापडलं उत्तर! शास्त्रज्ञांनी केला खुलासा
या जाहिरातीमुळे त्यांना विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागलेच, परंतु पुन्हा एकदा भाजप समर्थक त्यांच्यावर नाराज झाले. त्यानंतर फडणवीस यांनी शिंदे यांच्यासोबत कार्यक्रमाला जाणे टाळले होते. भाजप समर्थकांनीही अनेक शहरात बॅनर लावले होते. अशातच आता नांदेड शहरात भाजप समर्थकांकडून पुन्हा एकदा बॅनर लावण्यात आले आहेत.
शाईफेकनंतर अयोध्या पोळ यांनी दिली पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या, “ठाकरे गटाच्या बाजूने पोस्ट…”
’50 खोके आणि 105 डोके! देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र’ असे आशय असणारे बॅनर फडणवीस समर्थकांनी लावले आहेत. त्यात आचार्य चाणक्य यांचा फोटो आणि शेजारी 50 डोकी वापरली आहेत. या बॅनरबाजीमुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पालघर या ठिकाणी ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात एकत्र आले होते. ‘फेव्हिकॉल का मजबूत जोड है, ये टुटेगा नही’ असे विधान एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्यानंतर भाजप आणि शिंदे यांच्यातील वाद मिटला असे वाटले होते. परंतु,काल नांदेड शहरात आयटीआयजवळ ‘50 खोके, 105 डोके’ असे बॅनर पुन्हा लावले असल्याने हा वाद अजून शांत झाला नाही, असे दिसत आहे.