Manoj Jarange । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना करा अटक, कुणी केली मागणी? जाणून घ्या

Arrest Manoj Jarange Patel, who demanded it? find out

Manoj Jarange । जालना येथे मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेत्तृत्वात आंदोलन सुरु आहे. १३ दिवस उलटूनही यावर अजूनही कोणताच तोडगा निघाला नाही. राज्य सरकारकडून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत. ठोस निर्णय घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा पवित्रा जरांगे पाटील यांनी घेतलेला आहे. (Latest Marathi News)

Riteish Deshmukh Genelia । कुणीतरी येणार गं…! रितेश-जिनिलिया तिसऱ्यांदा होणार आई-बाबा? ‘त्या’ व्हिडीओवरून चर्चांना उधाण

आता मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्यात यावी अशी मागणी कुणबी सेनेने (Kunbi Sena) केली आहे. याबाबत कुणबी सेनेचे महाराष्ट्र प्रमुख विश्वनाथ पाटील (Vishwanath Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र देखील लिहले आहे. जरांगे पाटील यांचे आंदोलन बेकायदेशीर असून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे. यापूर्वी मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे.

Ajit Pawar । राज्याचे मुख्यमंत्री होणार का? खुद्द अजितदादांनी दिले स्पष्टीकरण

“जर मराठा समजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले तर ओबीसीमध्ये (OBC) असलेल्या ३७० च्यावर जातींवर अन्याय होईल. जरांगे पाटील यांच्याकडून सरकारवर दबाव टाकला जात आहे. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांना तातडीने अटक करावी,” अशी मागणी विश्वनाथ पाटील यांनी केली आहे. यावरून राज्याचे वातावरण आणखी चिघळू शकते.

Farmer Suicide । भयानक! दररोज 3 शेतकरी करतायत आत्महत्या, कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक आकडा

मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या मुंबईत एक बैठक बोलावली आहे. विशेष म्हणजे या बैठकीत राज्यातील विरोधी पक्षांचा समावेश असणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षणासह ओबीसींच्या भूमिकेवरही चर्चा होईल. त्यामुळे या बैठकीकडे आता मराठा समाजासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Breaking News | कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीने येरवडा कारागृहात केली आत्महत्या

Spread the love