Breaking News | कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीने येरवडा कारागृहात केली आत्महत्या

kopardi Case Update

Breaking News | अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीतील बलात्कार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरून टाकले होते. या प्रकरणातील आरोपी येरवडा जेलमध्ये होता. मात्र आता या हत्या प्रकरणातील दोषी जितेंद्र शिंदे याने कारागृहात आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आरोपी जितेंद्र शिंदे हा याप्रकरणी कारागृहामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत होता मात्र त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

Morocco Earthquake। मृत्यूचे भयान तांडव, ढिगारा उपसताच निघतात मृतदेह, आतापर्यंत सापडले दोन हजार मृतदेह; नेमकं काय घडलं? जाणून घ्या..

कारागृहात एखाद्या कैद्याने जीवन संपवणे ही खूप मोठी गोष्ट असून याचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे. शिंदे हा कोपर्डी घटनेचा दोषी असून त्याला शिक्षा सुनावली असून तो येरवडा कारागृहामध्ये शिक्षा भोगत होता. मात्र सकाळी त्याने कारागृहामध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे.

Tulsi Plant । रविवारच्या दिवशी तुळशीची पाने का तोडू नये? जाणून घ्या यामागचं मोठं कारण

या घटनेबाबत माहिती मिळतात वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाली आहेत. पोलिसांना आरोपीचा मृतदेह पहाटेच्या सुमारास आढळून आला. आता या घटनेबाबत अधिक तपास पोलीस यंत्रणा करत आहे.

Maratha Reservation । जरांगे पाटील यांनी त्यागलं पाणी आणि औषध, मुख्यमंत्र्यांनी घेतला सर्वात मोठा निर्णय

Spread the love