Multibagger Stocks | गुंतवणूकदारांची चांदी! 1 लाखाचा शेअर पोहोचला 72 लाखांवर; 7,100 टक्क्यांचा बंपर परतावा

Multibagger Stock

Multibagger Stocks | शेअर मार्केटमध्ये (Share market) गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या झपाट्याने वाढली आहे. काही शेअर गुंतवणूकदारांना करोडपती करतात तर काही शेअरमुळे गुंतवणूकदारांना (Investors) आर्थिक नुकसान सहन करावे लागते. तुम्हाला मार्केटमधील मल्टीबॅगर शेअर (Multibagger Stocks) माहिती असतील, ज्यामुळे गुंतवणूकदारांना शानदार परतावा मिळाला आहे. अशाच एका मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. (Latest Marathi News)

‘अर्धवटराव, मी काय म्हणालो, ते पूर्ण ऐकलेच नाही…, फडणवीसांची ठाकरेंवर जहरी टीका

Xpro India Share असे या शेअरचे नाव असून त्याने आपल्या गुंतवणूकदारांना मागील तीन वर्षांत 7,100 टक्क्यांचा जबरदस्त परतावा दिला आहे. त्यामुळे या कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे. 18 जून 2020 रोजी या शेअरची किंमत 12.31 रुपये इतकी होती. परंतु आज व्यवहारादरम्यान हा शेअर 895 रुपयांवर पोहोचला आहे. या शेअरची सर्वात मोठी कामगिरी आहे.

Instagram वर मैत्री झाली, प्रेमही झालं; हॉटेलवर बोलवलं अन् घडलं धक्कादायक; घटना वाचून हादराल

सोमवारच्या व्यवहारादरम्यान या शेअरची 2.87 टक्क्यांनी वाढ होऊन तो 895 रुपयांवर पोहोचला. तसेच आज तो 0.10 टक्क्यांनी किंवा 0.85 रुपयांनी वाढ होऊन 870.85 रुपयांवर बंद झाला आहे. समजा एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअर्समध्ये (Xpro India Share) 3 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याच्याकडे आज 72 लाख रुपये असते.

बिपरजॉयचा हाहाकार थांबता थांबेना! ४ जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती; रुग्णालयात शिरले पाणी

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *