Sanjay Raut । बिग ब्रेकिंग! प्रकाश आंबेडकरांसोबत युती संपुष्टात? संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानाने खळबळ

Sanjay Raut

Sanjay Raut । महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Alliance) युतीसाठी मागील काही दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. महाविकास आघाडीने तसा वंचित बहुजन आघाडीला प्रस्ताव देखील दिला होता. पण आता ही युती संपुष्टात आली असल्याचे बोलले जात आहे. याबाबत ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (Latest marathi news)

Topers Ad

Praniti Shinde | राजकारणातून सर्वात मोठी बातमी! प्रणिती शिंदेंचं थेट राम सातपुतेंना पत्र

“बाळासाहेब आंबेडकर आमच्यासोबत तर हा विजय जास्त दैदीप्यमान झाला असता. राज्यातल्या सोशित, पीडित, वंचित जनतेला आमच्यासोबत घ्यावं. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे सन्माननीय नेते असून आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आहे. जरी आगामी निवडणुकीत प्रकाश आंबेडकर सोबत नसले तरीही आम्ही निवडणूक जिंकू. आमच्या पाठिशी जनमत आणि लोकमत आहे. आम्ही आशा सोडलेली नाही,” असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

Raju Parve Resign । काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर राजू पारवे यांचा गंभीर आरोप, म्हणाले…

पुढे संजय राऊत म्हणाले की, “छगन भुजबळ, अजित पवार, जामीनावर सुटलेले हसन मुश्रीफ आणि नवाब मलिक जे तुमच्यासोबत आहेत. ते गँगस्टर आहेत का? कालच तु्म्ही नवीन जिंदाल यांचा पक्षात समावेश केला आहे. त्यांच्यावर तर सीबीआयची चार्जशीट आहे. ते गँगस्टर आहेत का? भाजपवाल्यांचं डोकं ठिकाणावर नाही, ते भांग पिऊन बोलत आहेत,” अशी जहरी टीकाही संजय राऊत यांनी यावेळी केली आहे.

Ajit Pawar । निवडणुकीत अजित पवारांना मोठा धक्का बसणार? शिवसेनेचा ‘तो’ मेसेज व्हायरल

Spread the love